येथे सांगितली जाणारी औषध योजना हि एक सदृढ आणि वीस वर्षाच्यावर वय गृहीत धरून लिहिलेली आहे,हे व्यक्तीनुसार बदलू शकते.
आम्ही आपणास दोन प्रकारचे औषध पाठवतो जे चूर्ण/पावडर रूपात असते .
यापैकी,
एक आपणास रोज दोन वेळा -दोन ग्राम एकावेळी गाईच्या कोमट दुधात घ्यावे लागेल . दुसरे एक औषध आपणास मेहंदी लावतो त्या पद्धतीने वापरावे लागेल म्हणजे दोन तास अगोदर भिजवायचे आणि नंतर लावायचे.
दुसरे औषध रात्री झोपण्या अगोदर लावावे लागते.
उपचाराचाच एक भाग म्हणजे सूर्याचे कोवळे ऊन्ह डागांवर घेणे.हे कोवळे ऊन्ह म्हणजे साधारणपणे सूर्योदयानंतर अर्ध्या तासाच्या आत असते. तसेच सूर्य मावळण्यापूर्वी अर्धा तास असे दोन्ही वेळेला घेतले तरी उत्तम. सगळे पथ्य पाळून संपूर्ण औषधी जरी घेत राहिले आणि ऊन्हात बसने जर टाळले तर संपूर्ण मेहनत पाण्यात गेलीच असे समजावे. एव्हढे ऊन्ह घेणे गरजेचे आहे हे ध्यानात असू द्यावे.
बस्स.
ही झाली औषध घेण्याची पद्धत.
आपणास जर याहून जलद बरे व्हायचे असेल तर याला पूरक अशी काही औषधी आहेत ज्या आपणास कुठल्याही औषधाच्या दुकानावर मिळू शकतात. यांचा वापर आपण केलात तर अजूनच चांगले असते.
या औषधी म्हणजे
१ बावची तेल किंवा चालमुंगरा तेल - हे तेल दिवसातून दोन-तीन वेळा डागांवर लावावे.
२-खदिरारिष्ट -हे पातळ औषध दोन वेळा १० मी.ली. कोमट पाण्यासोबत घ्यावे.
३-आरोग्यवर्धिनी बटी -२ गोळ्या दररोज २ वेळा-कोमट दुधासोबत.
४-गोमूत्र अर्क -१० मी. ली. दररोज २ वेळा -कोमट पाण्यासोबत.
यासोबतच,
कोरफडीची सावलीत वाळवलेली मुळी आणि तुळशीची सावलीत वाळवलेली मुळी,या दोन्ही मुळ्या गोमूत्रात सहाणेवर उगाळून लावल्यास आणखी फायदा होतो. फक्त एक गोष्ट लक्षात असू द्यावी कि दोन्ही मुळ्या एका वेळी उगाळू नयेत तसेच एकाच वेळी लावू नयेत.
काय आहे पथ्य -अपथ्य ?
हे खाऊच नका .
१ आंबट चवीच्या वस्तू जसे लिंबू,दही,लोणचे इ .
२-उडीद.
३-पपई
४-दारु .
हे कमी खा.
१-मीठ -दुकानात मिळणारे मीठ न खाता उपवासाचे सेंधे मीठ खावे किंवा हे सुद्धा कमी प्रमाणातच खावे.
२-चहा .
हे खूप खावे.
१-हरभरे -चणे- हे ज्या प्रकाराने म्हणजे भाजून,तळून,मोड आणून,आणि जेव्हढे खाता येतील तेव्हढे खाणे उत्तम ठरते.
२-सुका मेवा .
३-भरपूर प्रमाणात हिरव्या पाले-भाज्या.
४-
कलिंगडाच्या वाळवलेल्या बिया-दिवसातुन १०-१२ बियाखाव्यात.(किराणा/मिठाईच्या दुकानात मिळतात.)


No comments:
Post a Comment