एके दिवशी माझा शाळकरी मित्र मला भेटला,त्याला माझ्या या आजाराबद्दल पूर्ण माहिती होती ,त्यामुळे त्याने खूप आश्चर्याने माझी यातून सुटका कशी झाली याची माहिती घेतली. त्याने आपल्या भाचीबद्दल मला सांगितले. तिचे वय जवळपास अठ्ठावीस होते आणि तिला २ मुले पण असल्याचे तो बोलला. पुढे त्याने सांगितले कि तिला जवळपास लग्नानंतर आठ वर्षांनी अंगावर पांढरे आले आहेत. तिची एका डोळ्याची पापणी पूर्णपणे पांढरी दिसू लागलेली होती तसेच हाताच्या कोपरावर आणि पायाच्या घोट्याजवळ तळहाता एव्हढे दोन पांढरे डाग दिसू लागले आहेत.
एकंदर त्याने असे सांगितले कि त्या तीन डागांमुळे त्याची भाची पार हवालदिल झालेली आहे आणि तिच्या सासरचे वातावरण या कारणाने विचित्र झालेले आहे. शेवटी ,माझ्या या मित्राने मला असे आर्जवले कि तिला हि औषधी द्यावी.
हा प्रकार माझ्यासाठी काहीसा नवीन होता कारण हि औषधी बाकी कुठलाच उद्देश न ठेवता मी माझ्यासाठी बनवलेली होती.
मी हा औषधी प्रयोग करण्याचे ठरवले. मी त्याच्या भाचीला भेटलो आणि सर्व चौकशी तिला औषधी दिली.
औषधी सेवन केल्यानंतरच्या ३ महिन्यात तिची डोळ्याची पापणी पूर्वी होती तश्या रंगात दिसू लागली आणि नंतरच्या ३ महिन्यांमध्ये तिचे हाताच्या कोपरावरचा तसेच पायावरचे ,असे दोनही पांढरे डाग जवळपास ८०% कमी झालेले होते.
या सर्व उपचारांत एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे मला कुठलेच फोटो हे काढून ठेवावेत असे सुचले नाही.
माझ्या मित्राच्या भाचीला चांगला गुण आला या गोष्टीने मला चांगलाच हुरूप आला आणि मी होता होईल तेव्हढ्या लोकांना या गोष्टीचा लाभ पोहोचवण्याचे ठरवले.
नंतरच्या काही दिवसामध्ये मी आणखी पाच जणांना अश्याच पद्धतीने पांढऱ्या डागांच्या आजारात ठीक केले.
पण याही लोकांचे कुठलेच फोटो मी काढून ठेवले नाहीत जे कि खूपच चांगले झाले असते.
आता सध्या पाच जणांना हि औषधी पांढऱ्या डागांसाठी चालू आहे. या लोकांचे फोटोग्राफ्स मी नियमितपणे दर आठवड्याला घेतो आहे.यापैकी काही जणांचे फोटोग्राफ्स आपल्याला दर आठवड्याला येथे देण्याचा प्रयत्न मी करणार आहे,जेणेकरून हे पाहणे सोपे जाईल कि औषधी परिणाम करते किंवा नाही. साधारणपणे एक आठवड्याचे अंतर असेल तर डागांमध्ये म्हणजे त्वचेच्या रंगात झालेला फरक लक्ष्यात येऊ शकतो.
तसेच माझा अजून एक प्रयत्न चालू आहे कि एकजणाचा दर आठवड्याला व्हिडीओ अपलोड करायचा. हे काम दर आठवड्याला चालू आहे. या व्यक्तीचे पांढरे डाग ७०% बरे झाल्यावर एक पूर्ण व्हिडीओ एकत्रीकरण करून दाखवण्याचा प्रयत्न पण करणार आहे.
या पाच जणांच्या बद्दल थोडक्यात माहिती येथे देत आहे.
१-कु.सविता -वय १८,औरंगाबाद.
हि एक १२ वीत शिकणारी मुलगी आहे. तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर पांढरे डाग आहेत. हिने डिसेंबर २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात औषध घेण्यास सुरुवात केलेली आहे.
साधारणपणे दोन अडीच महिन्यात किती फरक झालेला आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता. जास्त माहितीसाठी तिच्या मामांना संपर्क करता येईल. श्री. शेळके -+919763529015 .
२- श्री. प्रदिप -वय ३२,औरंगाबाद.
हि एक शेतकरी व्यक्ती आहे ज्याच्या दोन्ही ओठांवर पांढरे डाग आहेत. २०१९ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उपचार चालू आहेत.
आपण त्यांना +91 8766554289 या क्रमांकावर संपर्क करू शकता.
३-कविता - वय १३ , जळगाव.
हि एक शाळेत जाणारी छोटी मुलगी आहे, तिच्या चेहऱ्यावर नाक आणि डोळ्यांभोवती पांढरे डाग आहेत. हिला जून २०१९ पासून उपचार चालू आहेत ,हिचे फक्त सध्याचे फोटो उपलब्ध आहेत ,त्या मध्ये आपण नव्याने आलेले रंग कण स्पष्टपणे पाहू शकता. हि एक छोटी मुलगी असल्या कारणाने तिच्या पालकांशी परवानगीने बोलता येईल.
४- कु. नमिता -वय २८ वर्षे बेंगलोर .
हि एक नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर करणारी तरुणी आहे. हिच्या हातावर आणि पायांच्या बोटावर असे ३ ठिकाणी छोटे छोटे डाग आहेत. डिसेंबर २०१९ च्या पहिल्या आठवड्यापासून औषधी सुरु आहे. साधारणपणे आतापर्यंत ३० टक्क्यांहून जास्त फरक पडलेला आहे. हिच्या पालकांना परवानगीने बोलता येईल.
५-कु. राणी -वय १४ वर्षे ,औरंगाबाद.
हिच्या
एका पायावर आणि मानेभोवती मोठे पांढरे डाग
आहेत. २०१९ जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून औषधी घेत आहे. जवळच्या नातेवाईकास
+91 9552668338 या
नंबरवर संपर्क होऊ शकतो.